सदस्य, ग्रामपंचायत लोंढेवाडी
मौजे लोंढेवाडी ता. माढा जि. सोलापूर हे माढ्यापासून ९ कि.मी. अंतरावर वसलेले गाव, गावाला दळणवळणाची सोय वाकावं रेल्वे स्टेशन १.५ किलोमीटर वरती आहे. तसा गाव दुष्काळी गाव म्हणून ओळखला जायचा मार्च महिना चालू झाला की गावाला पिण्याच्या पाण्यासाठी टँकरनी पाणीसुरवठा केला जायचा.
शेतात फक्त ज्वारी हरीभरा तूर पिके घेतली जायची उन्हाळ्यात शेतीला पाणी मिळत नसल्याने गावातील लोक स्थलांतरित व्हायचे काही कुटुंबे बि-हाड घेऊन उरळी कांचन व नागरगाव गेली आहेत कारण गावात शेती व्यवसायाला पाणी नव्हते.










